मुंबई विमानतळ उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला गोवंडीतून अटक

mumbai-airport-new

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवून देण्याची धमकी सोमवारी रात्री देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी गोवंडी येथून एका 25 वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

सोमवारी रात्री मुंबई विमानतळावर एका तरुणाने कॉल करून मुंबई विमानतळ बॉम्बने उडवणार असल्याची धमकी दिली. त्याने स्वत:चे नाव अहमद शेख असे सांगितले. तसेच त्याने तो हिंदुस्थानातील मुजाहिद्दीन या संघटनेचा दहशतवादी असल्याचे सांगितले. ही धमकी देताना त्याने काही संशयास्पद कोडवर्ड वापरले होते.

या धमकीच्या कॉलनंतर विमानतळ प्रशासनाने तत्काळ मुंबई पोलिसांत याची तक्रार दिली. त्यानंतर कलम 505 अंतर्गत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला.