
खराब अंड्यांच्या विक्रीवर निर्बंध घालण्यासाठी प्रत्येक अंडय़ावर उत्पादन व एक्सपायरी डेट टाकणे बंधनकारक करावे, अशी मागणी मुंबई महापालिकेच्या महासभेच्या पटलावर ठेवण्यात आली आहे. मार्चमध्ये समाजसेवक अॅड. नरेश दहिबावकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याच अनुषंगाने मालाड येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक अजित रावराणे यांनी याबाबतची ठरावाची सूचना पालिकेत मांडली आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या त्या निर्णयाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने राज्यभरातील विव्रेत्यांना अंड्यांवर ‘एक्सपायरी डेट’ टाकणे अनिवार्य करावे, अशी मागणी अॅड. नरेश दहिबावकर यांनी मार्चमध्ये केली होती. आता यासंदर्भातील ठरावाची सूचना नगरसेवक अजित रावराणे यानी मुंबई महापालिकेच्या महासभेच्या पटलावर ठेवली आहे.






























































