
चौपाटी, समुद्रकिनाऱ्यावरील परिसरात करडी नजर ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांच्या ताफ्यात नवीन 21 पऩशिक्षित घोडे दाखल झाले आहेत. हे घोडे हरियाणा, राज्यस्थान आणि केरळ राज्यातून आणले आहेत. सोमवारी सकाळी गिरगाव चौपाटीवर ताफ्यातील दोन घोड्यांना सरावासाठी आणण्यात आले होते. या घोड्यांना जुहू, अक्सा, उत्तन, गोराई बीच आणि गिरगाव चौपाटीसह अन्य चौपाटय़ांवर पेट्रोलिंगसाठी तैनात करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दिनी छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील परेडमध्ये हे घोडे पाहायला मिळणार आहेत. तसेच 26 जानेवारी – 15 ऑगस्ट संचलन, स्पर्धा, गस्त, व्हीआयपींसाठी पायलटिंग व जमाव निमंत्रणासाठी या अश्वपथकाचा वापर करण्यात येणार आहे.






























































