मे मध्ये 12 दिवस बँका बंद राहणार; आरबीआयकडून सुट्ट्यांची यादी जाहीर

मे महिन्याला अवघे काही दिवस उरले आहेत. रिझर्व बँकेने जाहीर केलेल्या यादीनुसार, मे महिन्यात बँका 12 दिवस बंद राहणार आहेत. याशिवाय लोकसभा निवडणुकी करीता काही राज्यांमध्ये बँका बंद राहणार असल्यातरी सुट्टीच्या काळात इंटरनेट बँकिंग सेवा सुरू राहतील.

मे महिन्यात एकूण 12 बँक हॉलिडे आहेत. यामध्ये विविध राज्ये आणि शहरांमध्ये होणाऱ्या सणसमारंभांचा समावेश आहे. त्याचबरोबर रवींद्रनाथ टागोर यांची जयंती, अक्षय्य तृतीया असे अनेक सण आहेत.

सुट्ट्यांची यादी –

1 मे – महाराष्ट्र दिन / कामगार दिन
या दिवशी महाराष्ट्र राज्यासोबतच, बेंगळुरू, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, तेलंगणा, पाटणा आणि तिरुवअनंतपुरम येथील बँका बंद राहणार आहेत.

5 मे – रविवार
5 मे रविवार असल्याने सर्व बँका बंद राहणार आहेत.

8 मे – रवींद्रनाथ टागोर यांची जयंती (रवींद्र जयंती)
केवळ कोलकता येथील बँका बंद राहतील.

10 मे – बसव जयंती/अक्षय तृतीया
10 मे रोजी बसव जयंती/अक्षय तृतीया निमित्त बेंगळुरूच्या सर्व बँकांमध्ये सुट्टी असेल.

11 मे- दुसरा शनिवार

12 मे – रविवार

16 मे – राज्य दिन
राज्य दिन निमित्ताने गंगटोक येथील सर्व बँका बंद राहतील.

19 मे – रविवार

20 मे – लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024
सार्वत्रिक निवडणुक असल्याने बेलापूर आणि मुंबईमधील सर्व बँका बंद राहणार आहेत.

23 मे – बुद्ध पौर्णिमा
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आगरतळा, ऐझॉल, नवी मुंबई, मुंबई, भोपळ, चंदीगढ, डेहराडून, जम्मू, कोलकाता, लखनऊ, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर या राज्यातील सर्व बँका बंद राहणार आहेत.