लातुरात कचरा टाकण्यासाठी घराबाहेर गेलेल्या अल्पवयीन मुलीस पळवले

कचरा टाकण्यासाठी घराबाहेर गेलेल्या अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची धक्कादायक घटना लातूर येथे घडली आहे. लातूरच्या देवणी तालूक्यातील मौजे आजणी येथे ही घटना घडली.

या प्रकरणी मुलीच्या वडीलांनी देवणी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यावरुन अज्ञात व्यक्तीविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी घरी असताना सायंकाळी ६ वाजता त्यांची मुलगी घरातून कचरा टाकून येते असे म्हणून बाहेर गेली. परंतू ती घरी परत आलीच नाही. कुटुंबीयांनी गावात सगळीकडे तिचा शोध घेतला परंतू ती सापडलीच नाही. दरम्यान या घटनेचा तपस पोलीस करत आहेत.