12 मुलांची आई तिसऱ्या नवऱ्याच्या शोधात, मात्र तिला पाहिजे 10 मुलांचा बाप असलेलाच नवरा

जगभरात वाढती लोकसंख्या हा चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे ‘छोटे कुटुंब…सुखी कुटुंब’ असे घोषवाक्य बनवून त्याची अंमलबजावणीही करण्यात येत आहे. वाढत्या महागाईमुळे अनेकजण संततीनियमन करत एकाच अपत्याचा विचार करत आहेत. मात्र, न्यूयॉर्कमधील एका महिलेला 12 अपत्ये असूनही तिला आणखी अपत्य हवे आहेत. आपली 12 मुले असून आपल्याला आणखी 10 मुले हवी आहेत, त्यामुळे आपण तिसऱ्या नवऱ्याच्या शोधात असून 10 मुलांचा बाप असलेलाच पती आपल्याला हवा आहे, असे तिने म्हटले आहे.

आपल्याला 12 मुले आहेत. जर 10 मुलांचा पिता असलेला पती आपल्याला मिळाला तर आपल्या मुलांची संख्या 22 होईल आणि सर्वाधिक मुले असलेली माता आपण बनू. त्यातच आपले समाधान आहे, असे तिने म्हटले आहे. 12 मुले असलेली वेरोनिका वयाच्या 14 वर्षीच पहिल्यांदा आई बनली होती. 2021 मध्ये 37 वर्षांची असताना ती दुसऱ्या पतीपासून विभक्त झाली. आता आपण तिसऱ्या पतीच्या शोधात असून 10 मुले असलेलाच नवरा पाहिजे, ही आपली अट आहे. इतर बाबतीत आपण समझौता करण्यात तयार आहोत. मात्र, त्या माणसाला 10 अपत्ये असलीच पाहिजे, या आपल्या अटीची पूर्तता झालीच पाहिजे, असे तिने म्हटले आहे.

मला मोठा परिवार हवा आहे. त्यामुळे शक्य असतील तितकी मुले जन्माला घालण्यातच मला समाधान मिळते. मला कमीतकमी 22 मुले हवी आहेत. त्यामुळे तिसऱ्या नवऱ्यासाठी ही महतत्वाची अट मी घातली आहे. एकाचवेळी 11 अपत्ये जन्माला घालणे शक्य आहे काय, याबाबत आपण डॉक्टर आणि तज्ज्ञांनाही विचारले आहे. मात्र, प्रकृतीबाबतची चिंता व्यक्त करत त्यांनी याला नकार दिला आहे. मात्र, मला माझ्या प्रकृतीची चिंता नाही. मला फक्त मोठे कुटुंब हवे आहे. आतापर्यंत आपल्याला मिळालेल्या दोन पतींनी आपली योग्य काळजी घेतली नाही. तसेच मोठे कुटुंब असण्याच्या माझ्या इच्छेशी ते सहमत नव्हते. त्यामुळे तिसऱ्यांदा जोडीदार निवडताना आपण खूप काळजी घेणार असल्याचेही तिने स्पष्ट केले.