राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत मुंबईच्या खेळाडूंचा दबदबा  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूलमध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग निवड स्पर्धेत मुंबई शहर किक बॉक्सिंग संघटनेच्या खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी करत 10 सुवर्ण, 10 रौप्य आणि 12 कांस्यांसह 32 पदकांची कमाई केली.

या स्पर्धेत पॉइंट फाईट, लाईट कॉन्टॅक्ट, किक लाईट, लो किक, फुल कॉन्टॅक्ट आणि क्रिएटिव्ह फॉर्म अशा विविध प्रकारांमध्ये मुंबई शहराच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय रेफरी विघ्नेश मुरकर आणि उमेश मुरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

या जोरदार कामगिरीमुळे मुंबई शहरातील खेळाडू आता राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी सज्ज झाले आहेत. विजेते सबज्युनिअर खेळाडू 17 ते 21 जून 2026 दरम्यान इंदूर पब्लिक स्कूल, मध्य प्रदेश येथे होणार्या सबज्युनिअर राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तसेच ज्युनिअर खेळाडू 30 मे ते 3 जून 2026 दरम्यान भुवनेश्वर, ओडिशा येथे रंगणाऱया राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत मुंबई शहराचे प्रतिनिधित्व करतील.

राज्य निवड स्पर्धेतील पदकविजेते

सुवर्णपदक – माही पायेलकर, जिदान खानसावीर पलाये, सय्यद अहमद, विघ्नेश परब, कुणाल सिंह, ध्रुव पालव, प्रज्ञेश पटवर्धन, श्रेयांक मौर्य, आणि संदीप पाटील.

रौप्यपदक – शामिका शिंदे, तेजस सकपाळ, प्रज्ञेश पटवर्धन, श्रेयांक मौर्य, माही पायेलकर, सिद्धेश आगवणेशिवम भनगे आणि साई साळेकर.

कांस्यपदकमानसी पाटवा, जिदान खान, सय्यद अहमदतेजस सकपाळ, रियांश पटवर्धन, त्विषा साळते, सिद्धेश आगवणे, शिधत गुप्ता, श्रियांश गायकवाड, आराध्य सिंह आणि रुद्र राणे.