मुंबईत 6 ठिकाणी बॉम्ब पेरल्याची धमकी; पोलीस अलर्ट, तपास यंत्रणांची धावपळ

मुंबईत 6 ठिकाणी बॉम्ब पेरण्यात आल्याचा धमकीचा संदेश वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस अलर्ट झाले आहेत. हा संदेश पाठवणाऱ्याचा शोध सुरू आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीकडून वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा संदेश आला. संपूर्ण मुंबईत 6 ठिकाणी बॉम्ब पेरण्यात आल्याचे संदेशात म्हटले आहे. या संदेशानंतर मुंबई पोलीस आणि तपास यंत्रणा सतर्क झाल्या असून संदेश पाठवणाऱ्याचा शोध सुरू आहे. ‘एएनआय’ने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.