LIVE Blog – लढलो आणि जिंकलो! शिवतीर्थावर जेन-झींची धडक, तिरंग्याचा जल्लोष; उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची उपस्थिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्ली, मुंबई-महाराष्ट्रासह देशभरात तब्बल 26 दिवस पेटलेल्या आंदोलनाच्या वणव्यानंतर अखेर प्रधान यांनी राजीनामा दिला. तरुणाईच्या बुलंद आवाजाला न्याय मिळाला. या विजयाचा प्रचंड जल्लोष दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सुरू आहे. तरुणाईच्या एकजुटीचे दर्शन यावेळी घडत असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या ठिकाणी पोहोचले आहेत.

वाचा सर्व लाईव्ह अपडेट – 

  • या संघर्षामध्ये आपण सर्वजण जात, पात, धर्म, पक्ष विसरून, होय मी भारतीय आहे, देशभक्त आहे या एकाच भावनेने सहभागी झालात – उद्धव ठाकरे

देशभक्त जिंकले! ही भाजप विरुद्ध भारत अशा संघर्षाची सुरुवात – उद्धव ठाकरे

  • ही संघर्षाची सुरुवात झालेली आहे, हा संघर्ष भारत विरुद्ध भाजप असा आहे – उद्धव ठाकरे
  • अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकले आहेत – उद्धव ठाकरे
  • आज केवळ आपले अभिनंदन करत नाही, तर देशातील तमाम देशभक्तांना अभिवादन करत आहे – उद्धव ठाकरे
  • आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली म्हणून एक मिनिटांचे मौन पाळण्यात आले.
  • राज ठाकरे यांनी नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची नावे वाचून दाखवली
  • या देशातील जेन झी हे सरकारच्या झिंज्या कशा उपटतात हे या आपल्याला या आंदोलनातून कळले – राज ठाकरे
  • आज भाषण करण्याचा दिवस नव्हे. तुम्ही जे आंदोलन देशभरात पेटवले आणि पेटवलेल्या आंदोलनाला यश आले त्याचा उत्साह साजरा करण्यासाठी तुम्ही सर्व जण हजर झालेले आहेत – राज ठाकरे

  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे शिवतीर्थावर दाखल
  • राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार शिवतीर्थावर दाखल
  • तरुणांची क्रिएटिव्हिटी, हातात वेगवेगळे पोस्टर घेऊन तिरंगा विजय जल्लोषात झाले सहभागी

  • वंदे मातरम्… भारत माता की जय… छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवान जय शिवाजी अशी गगनभेदी घोषणाबाजी

  • शिवसेना खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, आमदार महेश सावंत, हारून खान, मनसेचे यशवंत किल्लेदार, नितीन सरदेसाई मंचावर उपस्थित
  • छत्रपती शिवाजी महाराज पार्कावर तरुणांची तुफान गर्दी