महिलेची फसवणूक करणाऱ्या टांझानियन नागरिकाला अटक

74

सामना प्रतिनिधी। मुंबई

तीन वर्षांपूर्वी केरळमधील महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी टांझानियन नागरिकाला सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. रवेयेमामू मलाशनी असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात केरळ पोलिसांनी लूक आऊट नोटीस बजावली होती.

रवेयेमामू हा मूळचा टांझानियाचा रहिवासी आहे. तीन वर्षांपूर्वी त्याने केरळमधील महिलेची फसवणूक करून हिंदुस्थानातून पळ काढला होता. फसवणूक प्रकरणी कोठमंगलम पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. नुकताच तो हिंदुस्थानात पुन्हा आला होता. त्याने तक्रारदार महिलेला परदेशी नागरिक असल्याचे भासवले होते. महागडे गिफ्ट हिंदुस्थानातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले आहेत. कस्टममधून ते गिफ्ट सोडवण्याकरता 50 हजार रुपये जमा करण्यास सांगून त्याने महिलेची फसवणूक केली होती. महिलेने त्यावर विश्वास ठेवून पैसे जमा केले. जेव्हा त्या गिफ्टबाबत विमानतळावर चौकशी केल्यावर फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. फरार असलेल्या रवेयेमामूविरोधात केरळ पोलिसांनी लूक आऊट नोटीस बजावली होती. सोमवारी तो छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. तेव्हा विमानतळ अधिकाऱयांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशीकरता सहार पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याला लवकरच केरळ पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या