बी.कॉम सत्र 6चा निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाने उन्हाळी सत्रातील तृतीय वर्ष बी.कॉम सत्र 6 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत 16,636 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी 43.52 एवढी आहे. हा निकाल विद्यापीठाने फक्त 24 दिवसात जाहीर केला आहे.

30 दिवसाच्या आत निकाल जाहीर करण्यासाठी कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी, प्रकुलगुरू डॉ.अजय भामरे, परीक्षा विभागाचे संचालिका डॉ. पूजा रौंदळे व माजी परीक्षा संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी परिश्रम घेतले. मागील वर्षी बीकॉम सत्र 6 चा निकाल 6 जून रोजी जाहीर केला होता. या सर्व उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन व मॉडरेशन ऑनस्क्रीन मार्ंकग (OSM) पद्धतीने झाले आहे. सदर बीकॉम बरोबरच उन्हाळी सत्राच्या आजपर्यंत 8 परीक्षेचे निकाल विद्यापीठाने जाहीर केलेले आहेत.

परीक्षेत 54,901 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर 52,478 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामध्ये 16,636 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर 21,592 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. या परीक्षेचा निकाल 43.52 टक्के एवढा लागला आहे. 2423 विद्यार्थी हे परीक्षेला अनुपस्थित होते. 95 विद्यार्थ्यांचे निकाल हे कॉपी प्रकरणामुळे राखीव ठेवण्यात आले आहेत. तर 8688 विद्यार्थ्यांचे निकाल ते प्रथम किंवा द्वितीय वर्ष उत्तीर्ण नसल्याने राखीव ठेवण्यात आले आहेत.

सर्व्हरच्या क्षमतेत वाढ

50 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असल्याने बीकॉम सत्र 6 च्या आसन क्रमांकानुसार फाईल्स करून त्या संकेतस्थळावर टाकण्यात आल्या. जेणेकरून विद्यार्थ्यास संकेतस्थळावर निकाल पाहणे सुलभ होईल. यासाठी सर्व्हरची क्षमताही वाढविण्यात आली आहे. सदरचा निकाल विद्यापीठाच्या www.mumresults.in या संकेतस्थळावर टाकण्यात आला आहे.