­­­विद्यापीठाच्या ‘आयडॉल’ प्रवेशांना 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या वतीने राबविण्यात येणाऱया सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी किमान पात्रताधारकांना थेट प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील या सर्व अभ्यासक्रमांची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया https://mucdoeadm.samarth.edu.in या संकेतस्थळावरून करता येणार आहे. प्रवेशप्रक्रियेसंबधातील सर्व तपशील विद्यापीठाच्या https://cdoe.uom.edu.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.