
गणेश चतुर्थीच्या दिवशी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मध्यरात्री दमोने यांच्या घरातून अचानक धूर व आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या. काही वेळातच आगीने संपूर्ण घराला वेढा दिला. चार जणांचा मृत्यू झाल्याने चव्हाट गल्ली परिसरात शोककळा पसरली आहे.




























































