
गौण खनिजांचे उत्खनन, वाहतूक, परवाना आणि देखरेख प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता व कार्यक्षमता आणण्यासाठी महसूल विभागाने तयार केलेल्या ‘महाखनिज 2.0’ या डिजिटल प्रणालीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आले.
गौण खनिजांच्या व्यवस्थापनाची पारंपरिक प्रक्रिया ही मोठय़ा प्रमाणात कागदी व मानवी हस्तक्षेपाची असल्याने त्यात देखरेख ठेवताना अनेक अडचणी येत होत्या; त्यावर मात करत गौण खनिज प्रशासनाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला असून त्यांच्याच पुढाकाराने गौण खनिज प्रशासनात या माध्यमातून डिजिटल क्रांती येत आहे. ‘महाखनिज’ प्रणालीच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत राज्य शासनाच्या तिजोरीत सुमारे 16 हजार कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. आता ‘महाखनिज 2.0’ या नवीन व प्रगत आवृत्तीच्या माध्यमातून पुढील पाच वर्षांत 25 हजार कोटी रुपयांचे महसूल संकलनाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
‘महाखनिज’ची प्रमुख वैशिष्ट्ये
100 टक्के डिजिटल वाहतूक परवाना.
यापुढे प्रत्यक्ष कागदी वाहतूक परवान्याची गरज भासणार नाही.
जीपीएस व एआयद्वारे रिअल टाईम मॉनिटरिंग.




























































