मतदारांनो, यादीत नाव नसेल तर थेट मतदान केंद्र गाठा! नावनोंदणी, दुरुस्तीसाठी 19 सप्टेंबरपासून विशेष मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) ३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती सादर करता येणार आहेत. या कालावधीत नवीन मतदार नोंदणी, मतदारयादीतील नोंदींची दुरुस्ती आणि नाव वगळण्यासाठी नागरिकांना अर्ज करता येणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर १९ ते २७ सप्टेंबर या कालावधीत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान केंद्रांवर बीएलओ नागरिकांचे अर्ज स्वीकारणार आहेत.

एसआयआर प्रारूप मतदारयादीमध्ये अनेक मतदारांची नावे गैरहजर, स्थलांतरित किंवा अन्य कारणांमुळे वगळण्यात आली आहेत. अशा मतदारांना त्यांच्या सध्याच्या रहिवासी ठिकाणाहून मतदारयादीमध्ये नव्याने नाव समाविष्ट करण्यासाठी दावे व हरकतींच्या कालावधीत अर्ज करता येणार आहे. तसेच १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना मतदारयादीमध्ये नाव नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नवमतदार, प्रारूप मतदारयादीमध्ये नाव समाविष्ट न झालेल्या पात्र नागरिकांनी मतदारयादीत नाव नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदीमध्ये सुधारणा किंवा नाव वगळण्यासाठी या विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दिव्यांग, अल्पसंख्याकांचा सहभाग वाढविणार

मतदारयादी अधिक सर्वसमावेशक करण्यासाठी महिला, दिव्यांग, तृतीयपंथी, अल्पसंख्याक तसेच इतर पात्र नागरिकांचा मतदार नोंदणीतील सहभाग वाढविण्यावर यावे यासाठी विशेष जनजागृती आणि नोंदणी उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

विशेष भर देण्यात येणार आहे. या घटकांतील पात्र नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी व्हावी, तसेच त्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी होता विशेष शिबिरांसाठी नियुक्त करण्यात आलेले बीएलओ संबंधित मतदान केंद्रावर सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिरात सहभागी व्हावे.

मीनल कळसकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी