
लहान मुले खरंच किती निरागस असतात. कधी कधी या लहानग्यांच्या एका छोटय़ाशा कृतीने आपल्या सगळय़ांच्या चेहऱ्यावर एक छान हास्य फुलवते. या व्हिडीओमध्ये एक गोंडस चिमुरडा असे काही करतो की सगळय़ांना हसू आवरणे कठीण होते. हा मुलगा गणपती बाप्पाच्या हातात ठेवलेला मोदक उचलतो आणि खातो. हा व्हिडीओ @viral_gavthi.memes या इन्स्टा आयडीवरून शेअर करण्यात आला आहे.
व्हिडीओमागे बाप्पा आणि या चिमुरडय़ाचा संवाद आहे. तो म्हणतो, ‘बाप्पा एक मोदक घेऊ का?’ तर बाप्पा म्हणतो, ‘हो घे’, मुलगा म्हणतो, ‘खरंच खाऊ का?’ बाप्पाने होकार दिल्यावर मुलगा बाप्पाला ‘ठांकू बाप्पा…’ म्हणत आभारही मानतो. हा व्हिडीओ वेगाने वायरल होत असून एकाने कमेंट केलीय, ‘बाप्पा सदा सहायते’, तर अन्य एकाने लिहिलंय ‘खऱया अर्थाने मोदक बाप्पापर्यंत पोहोचला.’





























































