
गणेशोत्सवात पाच दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकासह डीजे वाजविण्यास जिल्हा प्रशासनाचे आदेशानुसार पोलिसांनी सवलत दिली आहे. त्यामुळे सार्वजनिक गणपती मंडळांना 19, 20, 22, 23 आणि 25 सप्टेंबर कालावधीत ध्वनीक्षेपक वादनासह डीजेला रात्री बारावाजेपर्यंत सवलत लागू राहणार आहे.
देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी, विसर्जन मिरकणुकीचा विचार करून प्रशासनाने पाच दिवस रात्री बारापर्यंत वादनाला परवानगी दिली आहे. तसेच संबंधित कालावधीत देखावेही मध्यरात्रीपर्यंत खुले ठेवता येणार आहेत. दरम्यान, मानाच्या गणपती मंडळांचे परवानगीचे ड्रोन वगळता इतर सर्व प्रकारच्या ड्रोन उड्डाणाला मध्यवर्ती भागात बंदी घातली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शहरात विनापरवाना ड्रोन उडविण्यास सक्त मनाई केली आहे.



























































