स्पाईसजेटच्या दोन विमानांना 24 तासांपेक्षा जास्त उशीर, संतप्त प्रवाशांची विमानतळावरच निदर्शने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतून दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या दोन विमानांना तब्बल 24 तास उशीर झाला. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी विमानतळावरच ठिय्या आंदोलन केले. ‘स्पाईसजेट चोर है’, ‘स्पाईसजेट हाय-हाय’ अशा घोषणाही संतप्त प्रवाशांनी दिल्या.

प्राप्त माहितीनुसार, स्पाईसजेटच्या दोन विमानांनी सुमारे 200 प्रवाशी दुबईला जाणार होते. ते सोमवारपासून वाट पाहत बसले होते. एका विमानाची सोमवारी सकाळी 7.45 वाजता तर दुसऱ्या विमानाची सोमवारी सायंकाळी 6.45 वाजता उड्डाणाची वेळ होती. मात्र उड्डाणाची वेळ सातत्याने बदलत गेली. याबाबत प्रवाशांना कोणतीही माहिती देण्यात येत नव्हती. या विमानांना 24 तासांपेक्षाही जास्त विलंब झाला. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी विमानतळावरच जोरदार घोषणाबाजी केली.

विलंब कशामुळे?

ऑपरेशनल कारणांमुळे उड्डाणांना विलंब झाल्याचे स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले. एक विमान ग्राउंड करण्यात आल्यामुळे तसेच इतर ऑपरेशन कारणांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली, असे प्रवक्त्याने सांगितले.