चेक बाऊन्स प्रकरण कोर्टात अ‍ॅक्टिंग नको; 2 कोटी दोन आठवड्यांत भरा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेक बाऊन्स प्रकरणात अडकलेले प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते राजपाल यादव यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देत पुढील 2 आठवडय़ांत 2 कोटी रुपये जमा करण्याची शेवट संधी दिली आहे. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या खंडपीठाने राजपाल यांच्या जुन्या वर्तनावर ताशेरे ओढले. ‘ते बॉलीवूडमध्ये अ‍ॅक्टिंग आणि ड्रामा करण्यात माहीर आहेत, पण न्यायालयातही त्यांनी तसाच प्रकार करू नये,’ असा कठोर इशारा न्यायालयाने दिला आहे.

राजपाल यादव यांच्याशी संबंधित चेक बाऊन्स प्रकरणाची गेल्या तीन वर्षांत दिल्ली उच्च न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत 15 वेळा सुनावणी झाली आहे. त्यात न्यायालयांनी कधी पैसे भरण्याचा तर कधी तडजोडीचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, राजपाल यांनी आदेशाचे पालन करण्यास नकार दिला आहे. हे प्रकरण ट्रायल कोर्टात सहा वर्षे रेंगाळले होते. दरम्यान सीजेई सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने राजपाल यादव यांना पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहेत. न्यायालयाने राजपाल यांच्या पूर्वीच्या वर्तणुकीमुळे त्यांच्यावर विश्वास ठेवण्याबाबत शंका व्यक्त करत त्यांचा पासपोर्ट जमा करण्याचा आदेशही दिला आहे.