मुख्यमंत्र्यांचे नागपूर पर्यटन जिल्हा म्हणून घोषित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संत्रा नगरी आणि व्याघ्र राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर जिह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे नागपूरच्या समृद्ध नैसर्गिक, वन्यजीव, धार्मिक, ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे.

भौगोलिक आणि नैसर्गिक दृष्टिकोनातून नागपूरची ओळख भारताची ‘व्याघ्र राजधानी’ अशी आहे. कारण जिह्याच्या परिसरात पेंच राष्ट्रीय उद्यान, उमरेड-कहांडला यांसारखी जागतिक दर्जाची अभयारण्ये आणि व्याघ्रप्रकल्प आहेत. नागपूर जिह्याचे वित्तीय आणि गैरवित्तीय महत्त्व लक्षात घेऊन, पर्यटन धोरण 2016 अंतर्गत नागपूर जिह्यास विशेष पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले आहे. यापूर्वी सरकारने सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगर या जिह्यांना पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केले आहे.

रामटेक येथील पुरातन राम मंदिर, शहराजवळील खिंडसी येथील जलक्रीडा पेंद्र आणि ऐतिहासिक दीक्षाभूमी ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. विस्तीर्ण आणि सदाबहार उद्याने, समृद्ध लोककला, हस्तकला प्रदर्शने तसेच आदिवासी लोकनृत्यांचे केंद्र असलेल्या नागपूर जिह्याची अफाट पर्यटन क्षमता, भौगोलिक महत्त्व आणि ऐतिहासिक वारसा लक्षात घेता नागपूरला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले आहे.