
सामना ऑनलाईन । रोहे
हिंदुस्थानी हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. आणि रायगड जिल्हा कबड्डी असो. यांच्या संयुक्त विद्यमाने 28 जानेवारीपासून वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा थरार रंगणार आहे. रायगड-रोहा येथील म्हाडा कॉलनीच्या मैदानावर मॅटच्या चार क्रीडांगणावर हे सामने खेळविण्यात येतील. या स्पर्धेत महासंघाला संलग्न असलेले 28 राज्याचे संघ व सेनादल, हिंदुस्थानी रेल्वे, बीएसएनएल हे व्यावसायिक युनिट असे 31 संघ सहभागी होणार आहेत.




























































