आफ्रिकेतल्या सियर लियोन देशात इंधन टँकरचा स्फोट, 100 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आफ्रिकेतला सियरा लियोन देशाची राजधानी फ्रीटाऊनमध्ये एका इंधन टँकरचा भीषण स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की त्यात 100 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 100 हून अधिक जखमी झाले आहेत.


फ्रीटाऊनमध्ये एका इंधनवाहू टँकरचा आणि बसचा अपघात झाला. तेव्हा या टँकरमधून इंधनाची गळती झाली. हे इंधन गोळा करण्यासाठी लोकांची मोठी झुंबड उडाली. तेव्हा या टँकरचा स्फोट झाला. या स्फोटात 100 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.