
हिंदुस्थानविरुद्ध कसोटी आणि टी-20 मालिकेत पराभवाची नामुष्की पत्करावी लागलेल्या इंग्लंडने आता एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी आपल्या 14 सदस्यीय संघाची घोषणा केली. दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला संघातून वगळण्यात आले असून कसोटी संघाचा कर्णधार जो रूटलाही एकदिवसीय संघात स्थान मिळाले नाही.
इंग्लंड ऍण्ड वेल्स क्रिकेट बोर्डा (ईसीबी)ने जाहीर केलेल्या संघात चार फिरकी गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. यात आदिल राशिद व मॅट पार्किन्सन हे लेगस्पिनर, तर मोईन अली व लियाम लिविंग्स्टोन हे ऑफस्पिनर गोलंदाज आहेत. शिवाय संघात डेव्हिड मलान, ख्रिस जॉर्डन व जॅक बेल यांना राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे. हिंदुस्थान-इंग्लंड दरम्यानची वन डे मालिका पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमवर होणार आहे.
इंग्लंडचा एकदिवसीय संघ – ओएन मॉर्गन (कर्णधार), मोइन अली, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, लियाम लिविंग्स्टोन, मॅट पार्किन्सन, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टॉपले व मार्क वूड.




























































