
OnePlus ने आपली पहिली स्मार्टवॉच लॉन्च केली आहे. स्मार्ट वेअर सेगमेंटमध्ये हे वनप्लसचे पहिले प्रोडक्ट आहे. यात अनेक खास फीचर्स कंपनीने दिले आहेत. आपल्या पहिल्याच स्मार्टवॉचची किंमत कंपनीने 16,999 रुपये इतकी ठेवली आहे.
या स्मार्टवॉचमध्ये 1.39 चे HD AMOLED डिस्प्ले देण्यात आले आहे. ज्याचे स्क्रीन रिझोल्यूशन 454×454 पिक्सल आहे. याचा डिस्पेल 2.5 डी ग्लाससह सुसज्ज आहे, तर त्यात 326 पीपीआय पिक्सेल डिसेंटी आहे. हे वॉच राउंड डाय आकारात 44 मिमी आकाराचे आहे.
14 दिवसांची बॅटरी लाईफ
वनप्लस वॉचमध्ये 402mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी सिंगल चार्जमध्ये 14 दिवस वापरता येऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे. तसेच यात 4GB स्टोरेज देण्यात आले आहे. ही वॉच Midnight Black आणि Moonligt Silver या दोन कलर पर्यायसह लॉन्च करण्यात आली आहे. यात जीपीएस कनेक्टिव्हिटीसह अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहे.




























































