उच्च शिक्षणासाठी हिंदुस्थानी विद्यार्थ्यांची सर्वांधिक पसंती ‘या’ दोन देशांना

गेल्या काही वर्षांपासून हिंदुस्थानी विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत. Oxford International’s Student Global Mobility Index (SGMI)च्या अहवालानुसार एक रंजक माहिती समोर आली आहे. दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. या अहवालानुसार परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी इच्छूक असणाऱ्या 69 टक्के हिंदुस्थानी विद्यार्थ्यांनी युके (54 टक्के), कॅनडा (43 टक्के) आणि ऑस्ट्रेलिया (27 टक्के) या देशांव्यतिरिक्त अमेरिकेला (USA) सर्वाधिक पसंती दिली आहे.

वेगवेगळ्या पैलूंवर अहवालाचा अभ्यास करण्यात आला होता. अहवालानुसार 45 टक्के विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या दर्जाला अधिक प्राधान्य दिले आहे. तसेच युएसएमध्ये उच्च शिक्षण घेण्याची महत्वकांक्षा बाळगणाऱ्या 42 टक्के विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठित विद्यापीठांना पसंती दिली आहे. तर 59 टक्के विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा दर्जा आणि 61 टक्के विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठित महाविद्यालयांना पसंती दिली आहे.

एसजीएमआय (SGMI) सर्वेक्षणामधून आणखी एक मोठी माहिती उघड झाली आहे. जवळपास 71 टक्के हिंदुस्थानी विद्यार्थ्‍यांनी सांगितले की परदेशात शिक्षण घेण्‍याच्‍या निर्णयामध्‍ये आई वडिलांचा महत्वाचा सहभाग असतो. हा ट्रेण्‍ड नायजेरिया (72 टक्‍के), पाकिस्‍तान (71 टक्‍के) आणि व्हिएतनाम (62 टक्‍के) यांसारख्‍या इतर देशांमधील विद्यार्थ्‍यांमध्‍ये देखील दिसून आला. यासंदर्भात 44 टक्‍के हिंदुस्थानी विद्यार्थ्‍यांनी सांगितले की परदेशात शिक्षण घेण्याच्या निर्णयामध्ये त्यांच्या मित्रांचे सुद्धा मोलाचे मार्गदर्शन मिळते.