पंढरपूर – अल्पवयीन मुलावर नराधमाने केला लैंगिक अत्याचार

681

निमणी येथे इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर एका इसमाकडून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी 4 वाजताच्या दरम्यान घडली. महादेव उत्तम गोंडे (28) असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध गडचांदूर पोलीस ठाण्यात पीडित मुलाने व त्याच्या परिवाराने तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा 11 वर्ष व त्याचा मित्र वय 15 हे दोघेही गावाजवळील शेतात बकऱ्या राखत असताना आरोपीने तुम्हाला हरभरा देतो म्हणून स्वतःच्या शेताकडे मोटारसायकल वर बसवून घेऊन गेला. यानंतर रानजीच्या झाडाखाली मोटारसायकल ठेवली व त्यांना त्यांचे कपडे काढायला सांगितले असता तिथून दोघांनीही पळ काढला. आरोपी त्या दोघांच्या मागे धावू लागला. आरोपीने यातील एक पीडित मुलाला पकडले व त्याला खांद्यावर उचलून शेतात घेऊन गेला. आरोपीने त्याचे पाय शेतातील वेलांनी बांधून त्याला मारझोड करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. यामध्ये पीडित विद्यार्थी जखमी झाला असून त्यांनी व त्याच्या मित्रांनी ही माहिती आपल्या आईला दिली. पीडित मुलाच्या आईने गडचांदूर पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली. पोलीस ठाणेदार गोपाल भारती यांनी शहानिशा करून आरोपींविरुद्ध कलम 377 आय पी सी 4/8/10 (3,2,5) पोक्सो अ‍ॅट्रास‌िटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंद करून अटक केली. आरोपीला सोमवारला न्यायालयात हजर केले असता त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या