दोन जागी निवडणूक लढायची की नाही हा संसदेचा अधिकार 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
हे पाच न्यायमूर्ती सध्या काय करतात याबाबत अनेकांना माहिती नाहीये. या पाचपैकी 4 न्यायमूर्ती हे आता निवृत्त झाले असून यातले एक न्यायमूर्ती हे सर्वोच्च न्यायालयात आहेत.

एकाच वेळी दोन जागांवर लोकप्रतिनिधींना निवडणूक लढवायला परवानगी देऊ नये, अशी दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. अशी परवानगी द्यायची की, नाही, ते संसदेचे काम आहे. संसद त्याबाबत कायदा करू शकते, तो अधिकार संसदेला आहे, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. लोकसभा किंवा विधानसभेच्या दोन जागा एकाच वेळी लढवणाऱया उमेदवाराला रोखण्यासाठी अश्विनी उपाध्याय यांनी जनहित याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा, न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.