आज पिंक मून

23 एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा आहे. चैत्र पौर्णिमेला दिसणाऱया चंद्राला पिंक मून असे म्हणतात. मंगळवारी संध्याकाळी 7 वाजून 49 मिनिटांनी चंद्र सर्वात तेजस्वी दिसेल. ही खगोलशास्त्राrय घटना आहे. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो. तसेच या दिवशी पौर्णिमा असते. त्यामुळे चंद्र मोठा दिसतो.

पिंक मून म्हणजे खऱया अर्थाने चंद्र पूर्ण गुलाबी दिसणार नाही. अगदी हलका गुलाबी होतो. पिंक मून हे नाव पूर्व अमेरिकेत आढळणाऱया मॉस पिंक नावाच्या फुलावरून देण्यात आले आहे. याला स्प्राऊटिंग ग्रास मून, एग मून, फिश मून, पासओव्हर मून, पाक पोया आणि फेस्टिव्हल मून असेही म्हणतात.

पिंक मून व्यतिरिक्त अनेकदा चंद्रमाच्या वेगवेगळय़ा छटा दिसतात. आकाशात सूर्यप्रकाश पसरल्याने चंद्राचा रंग लाल किंवा केशरी होतो. त्यामुळे आपल्याला चंद्र लाल दिसतो. प्रदूषणामुळे चंद्राचा रंग कधी पिवळा दिसतो. खगोलशास्त्रानुसार, वातावरणात विखुरलेल्या प्रकाशामुळे चंद्राचा रंग निळा दिसतो. चंद्रावरील डागांमुळे चंद्राला तपकिरी रंग येतो.