
शहरातील गोकुळनगरमधील पोलिसाने केलेल्या बलात्कार प्रकरणानंतर पोलीस दलात खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पडणाऱया तिघांना ताब्यात घेत दोन राजस्थानी तरुणींची सुटका केली.
जनताबाई तिल्लोर, कविता कट्टीमणी आणि नितीन ठोकळ (रा. टिंबर एरिया) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
गोकुळनगरमधील दुसऱ्या गल्लीत संशयित जनताबाई तिल्लोर ही कुंटणखाना चालवीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार छापा टाकण्यात आला. त्यावेळी संशयित महिला पीडितांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायासाठी भाग पडत असल्याचे दिसून आले. 25 वर्षीय युवती चौथका (वरवाड, राजस्थान) येथील, तर दुसरी 21 वर्षीय युवती भवानीपुरा (बनगामाता बुंदी, राजस्थान) येथील आहे. पोलिसांनी त्यांची सुटका केली. त्यांना सांगलीत आणून त्यांच्याकडून व्यवसाय करून घेत तिघे स्वतःचा उदरनिर्वाह चालवीत होते. घराची मालकीण संशयित कविता कट्टीमणी आणि व्यवसायासाठी संरक्षण दिल्याप्रकरणी नितीन ठोकळे याच्यावरही यावेळी गुन्हा नोंद करण्यात आला. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक तानाजी कुंभार यांनी फिर्याद दिली.





























































