आणखी एका पोलिसाचा कोरोनाने मृत्यू

महाराष्ट्र सायबरमध्ये कार्यरत असणाऱया पोलीस शिपायाचा कोरोनाने मृत्यू झाला. हर्षल रोकडे असे त्याचे नाव आहे तर राज्यात कोरोनाने आतापर्यंत 384 पोलीस शहीद झाले आहेत. हर्षल हे गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र सायबरमध्ये काम करत होते. गेल्या आठवडय़ात त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली.

ती चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावू लागल्याने त्यांना उपचारासाठी शीव लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले. गेल्या आठवडय़ात त्यांचा सिटी स्कॅनदेखील करण्यात आला होता. त्यांच्या फुप्फुसाला संसर्ग झाल्याचे तेव्हा वैद्यकीय अहवालात उघड झाले. उपचार सुरू असतानाच अचानक त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावल्याने रविवारी त्यांचा मृत्यू झाला तर हर्षल यांची पत्नी आणि मुलालादेखील कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या