गणेशोत्सवातील जाचक अटींवर कायदेशीर तोडगा काढा-शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नागपूर

गणेशोत्सवाच्या काळात सरकारने व न्यायालयाने घातलेल्या अनेक अटींमुळे हा उत्सव साजरा करणे गैरसोयीचे होत आहे. सरकारने लादलेल्या अनेक जाचक नियमांमुळे गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्यापासून श्री गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अनेक अडचणींचा सामना करावा असल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये सरकारच्या विरोधात नाराजीची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना येणाऱ्या अडचणींवर कायदेशीर तोडगा काढावा अशी मागणी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे केली.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून या महामार्गाची मोठय़ा प्रमाणावर दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांची मोठय़ा प्रमाणावर गैरसोय होण्याची शक्यता आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी शासनाने आतापासूनच उपाययोजना हाती घ्यावी अशी मागणीही शिंदे यांनी यावेळी केली.