पुणे – घरफोडी करून ब्रॅण्डेड वस्तूंची चोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंद फ्लटचे कुलूप तोडून चोरट्यांनी 1 लाख 71 हजारांच्या ब्रॅण्डेड वस्तूंची चोरी केल्याची घटना 6 जुलैला औंधमधील हर्ष विहार सोसायटीत घडली. याप्रकरणी गौरव साठे (वय 42 रा. न्यू डीपी रोड, औंध) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

गौरव हे कुटूंबियासह हर्ष विहार सोसायटीत राहायला असून 6 जुलैला ते बाहेरगावी गेले होते. त्यावेळी मध्यरात्री दीडच्या सुमारास चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप उचकटून व्हिडिओ कॅमेरा, ब्रॅण्डेड घड्याळ, सोन्याचे कॉईन, अमेरिकन डॉलर असा मिळून 1 लाख 71 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बी. आर. झरेकर तपास करीत आहेत.