
लष्कराच्या ग्रुप सी विभागातील भरतीच्या लेखी परीक्षेत विद्यार्थ्याने कॉपी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक डिवाईसचा वापर केल्याचे उघडकीस आले आहे.
या प्रकरणी अमन रामेश्वरम सिंग (वय 22, रा. चित्तर, जीद, हरियाना) याला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. नाईक सुभेदार प्रदिप शिंदे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार खडकी येथील बीईजी स्पोर्टस कॉम्लेक्समध्ये रविवारी दुपारी घडला.
लष्कराच्या ग्रुप सी विभागाकरीता डिफेन्समध्ये रिक्रुट इंग्लायमेंट मुख्यालय डिफेन्स मिलिटरी जनरल स्टॉफ ड्युटी देहुरोड येथे भरतीची लेखी परीक्षा खडकी येथील स्पोर्ट कॉम्लेक्समध्ये रविवारी होती.
या वेळी अमन सिंगने इलेक्ट्रॉनिक डिवाईस लपवून परीक्षा केंद्रात प्रवेश केला. परीक्षा सुरू असताना त्याच्याकडे कॉपी करण्याकरता इलेक्ट्रॉनिक डिवाइसचा वापर केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक एन पाटील पुढील तपास करीत आहेत.






























































