रेल कामगार सेनेच्या रनिंग शाखेचे आज वार्षिक अधिवेशन, दादरमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या कामगारवर्गात मोठा दबदबा निर्माण केलेल्या रेल कामगार सेनेच्या रनिंग शाखेचे 25 वे वार्षिक अधिवेशन गुरुवार, 2 जुलै रोजी पार पडणार आहे. दादर रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्र. 5 जवळील सेंट्रल रेल्वे इन्स्टिटय़ूटमध्ये दुपारी 3 वाजता भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या रौप्य महोत्सवी अधिवेशनात रनिंग स्टाफच्या विविध सेवा, सुरक्षा, कल्याण व प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार असून संघटनेच्या भावी वाटचालीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत.

रेल कामगार सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते विनायक राऊत, सरचिटणीस तथा शिवसेना उपनेते दिवाकर देव (बाबी), कार्याध्यक्ष संजय जोशी, मुंबई मंडळ अध्यक्ष चंद्रकांत विनकर तसेच मुंबई मंडळ सचिव तुकाराम कोरडे आदी मान्यवरांची अधिवेशनाला प्रमुख उपस्थिती असणार आहे. अधिवेशन प्रमुख म्हणून राकेश कुमार महतो, गणेश लोहार व दीपक लाड, तर उपप्रमुख म्हणून भास्कर म्हात्रे, अखिलेश कुमार, उपेंद्र कुमार व सागर नलावडे कार्य पाहणार आहेत. अधिवेशनाला रनिंग शाखेतील सर्व कर्मचारी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच रेल्वे कर्मचारी व प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वागत समितीच्या वतीने प्रशांत कमानकर (रनिंग स्टाफ प्रमुख), अमोघ निमसुडकर (सबर्बन प्रमुख), संतोष देवळेकर (सचिव, ट्रफिक शाखा) आणि सूरज निकाळजे (अध्यक्ष, ट्रफिक शाखा) यांनी केले आहे.