उपकरप्राप्त इमारतींच्या दुरुस्तीसाठी म्हाडाला सक्षम प्राधिकरण घोषित करण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भायखळा पूर्व व पश्चिम येथील मदनपुरा, मुंबई सेंट्रल, माझगाव, डॉकयार्ड रोड, घोडपदेव आणि चिंचपोकळी या भागांमध्ये अनेक जुन्या व धोकादायक तसेच पागडी उपकरप्राप्त इमारती पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक ठिकाणी मालकांकडून भाडेकरूंवर न्यायालयीन कारवाई करून बेघर करण्याची कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे बेघर होण्याच्या मार्गावर आहेत. महापालिकेने संबंधित इमारतींची दुरुस्ती म्हाडामार्फत करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. उपकरप्राप्त इमारतींच्या दुरुस्तीसाठी सरकारने म्हाडाला सक्षम प्राधिकरण म्हणून घोषित करणे गरजेचे आहे, अशी मागणी शिवसेना आमदार मनोज जामसुतकर यांनी केली.