
सामना ऑनलाईन । मुंबई
अक्षयकुमार आणि रजनीकांत स्टारर सिनेमा ‘2.0’ पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाल्यापासून हा चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांची उत्कंठा शीगेला पोहोचली आहे. या सिनेमात अक्षय कुमार वेगळ्याच लुकमध्ये दिसणार असून यात वीएफएक्सचा चांगला उपयोग करण्यात आला आहे. हा सिनेमा याच आठवडय़ात रिलीज होणार आहे मात्र त्याआधीच या सिनेमाने प्रभासच्या बाहुबली 2 चा विक्रम मोडला आहे. प्रभासचा बाहुबली 2 हा सिनेमा 2017 चा हिट सिनेमा ठरला होता. या सिनेमाचे वैशिष्टय़ही वीएफएक्सचा शानदार वापर हेच होते. बाहुबली देशभरातील सुमारे 6500 स्क्रिनवर रिलीज झाला होता. आता 2.0 हा सिनेमाही सुमारे 6800 स्क्रिनवर झळकणार आहे.




























































