रांचीत बुमराला विश्रांती आणि राहुलचे कमबॅक होण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी गोलंदाजीचा आधारस्तंभ असलेल्या जसप्रीत बुमराला चौथ्या कसोटीत विश्रांती देणार असल्याचे बीसीसीआय सूत्रांकडून कळले आहे. तसेच दुसऱया आणि तिसऱया कसोटीत खेळू न शकलेला लोकेश राहुल चौथ्या कसोटी खेळणार असल्याचेही समोर आले आहे. तो आता 100 टक्के फिट असून तो रांचीत हिंदुस्थानची मधली फळी मजबूत करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. राजकोट कसोटीपूर्वी तो 90 टक्के फिट होता, त्यामुळे त्याला खेळविण्याचा धोका संघ व्यवस्थापनाने घेतला नव्हता. आता तो संघात आल्यावर सलग दोन कसोटी खेळूनही विशेष काहीही करू न शकलेल्या रजत पाटीदारला आपले स्थान गमवावे लागणार आहे. तसेच बुमराच्या जागी कोणत्या गोलंदाजाला संधी मिळेल, हे मात्र अनिश्चित आहे. तसेच तिसऱया कसोटीपूर्वी रणजी स्पर्धेसाठी मुकेश कुमारला मुक्त करण्यात आले होते. आता तो पुन्हा संघात सामील होण्यासाठी रांची गाठणार आहे.