नक्षलबारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुरेश पाटील

देशाच्या सुरक्षेला सध्या दहशतवादी, नक्षलवाद्यांचा मोठा धोका आहे. त्याचे परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागत आहेत. सुरेश पाटील यांची नक्षलवादाशी संबंधित ‘नक्षलबारी’ ही कादंबरी लवकरच संस्कृती प्रकाशनाद्वारे प्रकाशित होत आहे. या कादंबरीतील हा संक्षिप्त भाग.

माहीनं दुर्गा किसन्या दांडेचा फ्रश्न मार्गी लावला होता. तिलाही गुन्हे अन्वेषण विभागात ठेवण्यात आलं होतं. पोरगी हिमतीची असल्याचं माहीच्या लक्षात आलं होतं. दुर्गाचं गाव धारागड तालुक्यातलं. किसन्याला एक बायको व तीन मुलं. मुलगा फ्रकाश व दोन मुली दुर्गा व देवी. शाळेत पोरींना दुपारचं जेवण मिळतं. घरी न्यायला तांदूळ मिळतो, म्हणून किसन्यानं त्यांना शाळेत भरती केलं. शाळा सांभाळून दोघी घरातली कामंही करायच्या. फ्रकाशनं मात्र शाळेचं तोंड पाहिलं नाही. तो किसन्याचा पैरणीचा शेव पकडून राहिला. किसन्याही हिंमतवान होता. त्यानं काबाडकष्ट करून आपल्या घराचं रंगरूप पालटलं होतं. घराच्या भिंती भेंडय़ाच्या असल्या तरी त्यानं घरावर मंगलुरी कौलं चढवली होती. जंगल भागात रान काढून तो भात पिकवत होता. उन्हाळ्यात तो व त्याची बायको बायना रस्त्याच्या कामावर जायची. फ्रकाशही असायचा. फावल्या वेळात किसन्या मोहाची दारू काढायचा. तशी जिह्यात दारूबंदी होती; पण जंगल भागात तपासणी करायला कोण येतंय? किसन्या वडय़ा-वगळीला भट्टी लावायचा. त्याला फ्रकाशची मदत व्हायची. अनेकदा दुर्गा व देवीही मदत करायच्या. त्यांची मदत म्हणजे भट्टीसाठी जंगलातून वाळकी लाकडं आणणं!

दारूच्या भट्टीवर चुकूनमाकून धाड पडलीच तर उगाच गुंतागुंत नको म्हणून किसन्या दारूच्या बाटल्या परडय़ात जमिनीत पुरून ठेवायचा. हाताशी एखादी असावी म्हणून तो एखाद्-दुसरी बाटली गोठय़ात ठेवायचा. गिऱहाईक आलं की त्यातलीच द्यायची.

कधीतरी एखाद्या पोलीस, वन सुरक्षा कर्मचाऱयाला सांसूद लागायचा. मग तो अचानक घरी टपकायचा. घर तपासायचा. घरात जळणासाठी आणलेलं लाकूड-फाटं नजरेखाली घालायचा. जनावरांची वैरणही त्याच्या नजरेतून सुटायची नाही. काही सापडलं नाही तरी ‘चल पोलीस ठाण्यात’ ही धमकी देत घरात बसून राहायचा. मग किसन्याला त्याचं हात ओलं केल्याशिवाय भागायचं नाही. दारात एखादी दाणे टिपणारी कोंबडी नजरेला पडली तर तीही तो काखोटीला मारायचा!

दारूनं किसन्याला पैसा दिला; पण पोरगा गमावला. भट्टी लावून किसन्या बऱयाचदा फ्रकाशला भट्टीजवळ बसवायचा. तिथं ते यायचे. त्यांच्यातलं कुणी प्यायचं नाही; पण त्यांची फ्रकाशशी गट्टी जमली. कोवळं मन; पण धडाडी दांडगी. फ्रकाशनं त्यांच्याजवळची बंदूक पहिल्यांदा हातात घेतली त्या दिवशी तो फुलारून गेला. काही दिवसांतच तो त्यांच्यातच सामील झाला व गाव सोडून गेला. किसन्यानं त्याचा शोध घ्यायचा फ्रयत्न केला; पण मागमूस लागला नाही. त्यानंतर त्याला फ्रकाशचं दर्शन झालं नाही. तो जगला की मेला… काहीच खबर लागली नाही.
दुर्गा दहावीच्या वर्गात होती तर देवी नववीला. गल्लीत सोलर दिव्यांचा फ्रकाश असायचा. एके दिवशी सकाळी दुर्गाला नेहमीफ्रमाणं जाग आली. ती उठली. तिनं पाहिलं तर अजून आई-बाबा झोपलेलेच होते. तिला आश्चर्य वाटलं. पहिल्या कोंबडय़ावर किसन्याचा दिवस सुरू व्हायचा. आज तांबडं फुटलं तरी तो अंथरुणात! तिनं त्यांना हाक मारली. त्यांचं एक नाही की दोन. आई-बाबा ‘ओ’ का देत नाहीत म्हणून ती गंभीर झाली. त्यांना उठवण्याच्या इराद्यानं ती त्यांच्या बिछान्याकडे निघाली, तर त्यांच्या अंथरुणात तिला हलत असलेली दुणती-तिणती घडी दिसली. रंग परिचयाचा. पाय थबकले. गडबडीनं उठलेल्या देवीला घेऊन ती दाराकडे धावली. गावकऱयांसह सापाला कसंबसं चेचलं. किसना व बायनाचं अंग काळंनिळं पडलं होतं. तोंडाला फेस येऊन तोही आटला होता. डोळे आडय़ाच्या पडय़ाल पाहत होते.

दुर्गाला चार दिवस जेवण गेलं नाही. घरचा सगळा भार तिच्या खांद्यावर आला. तिची शाळा सुटली; पण तिनं देवीची शाळा सुरू ठेवली अन् एके दिवशी देवीचं शाळेचं दप्तर घेऊन तिच्या वर्गातलं पोरगं आलं. त्यानं दुर्गाला सांगितलं, ‘माझ्याकडे दप्तर देऊन देवी त्यांच्याबरोबर गेली!’

दुर्गाच्या पायाखालची वाळू सरकली. नक्षलींनी अगोदरच भाऊ गिळला होता. आता बहीण. तिने देवीला शोधण्यासाठी पायाला भिंगरी बांधली. गावोगाव फिरली. ठिकठिकाणी जंगलात आतपर्यंत गेली. पाच-सहा दिवसांनी तिचा पत्ता लागला. पण देवीने तिच्याबरोबर येण्यास नकार दिला.