मोदींवरील डॉक्युमेंटरीवरून रशियाचा बीबीसीवर निशाणा, माहिती युद्ध छेडल्याचा केला आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील डॉक्युमेंटरीवरून रशियाने आता बीबीसीला लक्ष्य केले आहे. रशियाने बीबीसीवर माहिती युद्ध छेडल्याचा आरोप केला आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी ही टिप्पणी केली.

मॉस्को, पीटीआय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील माहितीपटावरून रशियाने आता बीबीसीला लक्ष्य केले आहे. रशियाने ब्रिटीश ब्रॉडकास्टरवर वेगवेगळ्या आघाड्यांवर माहिती युद्ध सुरू केल्याचा आरोप केला आहे. रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी शुक्रवारी बीबीसीच्या वादग्रस्त माहितीपटाबद्दल विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

त्या म्हणाल्या की आमच्या हिंदुस्थानी मित्रांनी या परिस्थितीवर आधीच भाष्य केले आहे. बीबीसी विविध आघाड्यांवर माहितीयुद्ध छेडत असल्याचा हा आणखी एक पुरावा आहे याकडे मी तुमचे लक्ष वेधून घेऊ इच्छिते.

त्या म्हणाल्या की, हे केवळ रशियन फेडरेशनच्या विरोधात नाही तर स्वतंत्र धोरणाचे पालन करणार्‍या इतर जागतिक शक्ती केंद्रांच्या विरोधात देखील आहे. झाखारोवा म्हणाले की, हे स्वतंत्र टीव्ही आणि रेडिओ कॉर्पोरेशन नाही. ते अनेकदा पत्रकारिता व्यवसायाच्या मूलभूत आवश्यकतांकडे दुर्लक्ष करतात. गेल्या आठवड्यात, यूएस स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी देखील मोदींवरील डॉक्युमेंटरीवर भाष्य केले होते. ते म्हणाले की, अमेरिका आणि हिंदुस्थान हे दोन समृद्ध लोकशाही टिकवून ठेवणारे देश आहेत.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीही पंतप्रधान मोदींचा बचाव केला आहे. बीबीसीने बनवलेल्या डॉक्युमेंटरीशी ते सहमत नसल्याचे त्यांनी सांगितले होते. एका खासदाराच्या प्रश्नाला उत्तर देताना सुनक म्हणाले की, याबाबत यूके सरकारची भूमिका स्पष्ट आहे आणि त्यात बदल झालेला नाही, अर्थातच मी डॉक्युमेंटरीशी सहमत नाही.