
सामना प्रतिनिधी । जालना
संभाजी भिडे यांच्या बैठकीला विरोध करून घोषणाबाजी करणाऱया भारिप बहुजन महासंघ आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी आज लाठीहल्ला करत 35 जणांना ताब्यात घेतले. ‘शिवप्रतिष्ठान’चे भिडे गुरुजी हे 27 जानेवारी रोजी होणाऱ्या गडकोटी मोहीम आणि शिवछत्रपतींचे 32 मण सुवर्ण सिंहासन निधी संकलनासाठी जालन्यात आले होते. त्यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमादरम्यान बाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
भारिप बहुजन महासंघ व संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची घोषणबाजी सुरू होताच पोलिसांनी लाठीचार्ज करून कार्यकर्त्यांना पांगवले. 35 जणांना ताब्यात घेतले. आठ दिवसांपासून संभाजी भिडे गुरुजी यांच्या दौऱयाबद्दल सोशल मीडियातून चर्चा झाली होती. अनेकांनी त्यांचा दौरा व्हायवरल करून या कार्यक्रमाला विरोध दर्शविला होता.
दरम्यान, शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांचे शहरातील एका हिंदी विद्यालयात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याच ठिकाणी भारिप बहुजन महासंघ व संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. संभाजी भिडे पोलीस संरक्षणात संभाजीनगरकडे रवाना होत असताना काळे झेंडेही दाखविण्यात आले.
आम्ही विश्वधर्म पाळणारी माणसं!
आपण किश्कधर्म पाळणारी माणसे आहोत. मानकधर्म पाळणाऱयांमध्ये फक्त मानकाचाच किचार केला जातो, परंतु किश्कधर्मात माणसासोबतच पशू-पक्ष्यांचाही किचार केला जातो. याची प्रचीती संत ज्ञानेश्करांनी पसायदानातून करून दिली आहे, असे कक्तक्य ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केले.
































































