भाजपची टोळी महाराष्ट्र बुडवणारी! वरवंडमधील सभेत संजय राऊत यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप सरकारने सहकार क्षेत्राचे वाटोळे केले आहे. सत्तेचा गैरवापर करीत सर्वसामान्यांसह अनेकांना वेठीस धरले जात आहे. राज्यातील भ्रष्टाचाराचे सर्वांत मोठे प्रकरण भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे असून तेथे तब्बल 500 कोटींचा घोटाळा झाला आहे. भाजपचे आमदार राहुल कुल यांनी या कारखान्यात मोठा भ्रष्टाचार केला आहे. राज्यात सत्तेवर असणारी भाजपच्या फडणवीसांची ही टोळी महाराष्ट्र बुडविणारी आहे, असा जबरदस्त हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

‘भीमा पाटस’मधील घोटाळय़ाची तक्रार मी सीबीआयकडे दाखल केली आहे. जोपर्यंत कारखाना स्थिरस्थावर होत नाही तोपर्यंत आम्ही भ्रष्टाचाऱयांना सोडणार नाही, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.

वरवंडमध्ये बुधवारी संजय राऊत यांची सभा झाली. सभेला आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार रमेश थोरात, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे, शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, वैशाली नागवडे, अॅड. संभाजी थोरवे उपस्थित होते.

संजय राऊत म्हणाले, भीमा पाटस कारखान्यातील भ्रष्टाचाराची पोलखोल होणार असल्याने येथे सत्तेचा गैरवापर सुरू आहे. परिसरात 144 कलम लागू केले. पोलिसांनी आम्हाला कारखाना परिसरात जायचे नाही, असे सांगून अडविले, पण आम्ही घाबरलो नाही. कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय मधुकर शितोळे यांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून सभेला आलो. कारखाना कोणाच्या बापाचा नसून 50 हजार शेतकऱयांचा आहे. त्या कारखान्याची राहुल कुल यांनी माती केली. शेतकऱयांवर अन्याय केला. भाजप आमदार राहुल कुल यांनी कारखान्यात भ्रष्टाचार केला आहे. त्याचे ऑडिट रिपोर्ट आमच्याकडे आहेत. त्याबाबत आम्ही सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर ईडी आणि मग न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहोत.

कलम तोडले… जोरात सभा सुरू आहे!

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सभा सुरू होण्यापूर्वी संजय राऊत यांना पह्न आला होता. याबाबत माहिती देताना संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मला सभेबाबत विचारले असता, मी सभा जोरात सुरू असल्याचे त्यांना सांगितले. तर उद्धव ठाकरे यांनी परिसरात 144 कलम लावले आहे त्याचे काय? अशीही विचारणा केली. त्यावर आपण कलम तोडले, असे सांगितले. तेव्हा उपस्थित शेतकऱयांनी टाळय़ांचा कडकडाट करीत घोषणाबाजी केली.

कारखान्यात धडक

वरवंड ः भीमा पाटस कारखान्याची पाहणी करण्यास संजय राऊत निघाले असताना त्यांना पोलिसांनी तीनदा अडवण्याचा प्रयत्न केला. आत जाण्यासाठी एनओसी लागेल, 144 कलम लागू आहे अशी अट पोलिसांनी घातली. त्यावेळी संजय राऊत यांनी हक्कभंग आणण्याची तंबी देताच दोन मिनिटांत पोलिसांनी त्यांच्यासाठी कारखान्यात जाण्याचा रस्ता मोकळा केला आणि संजय राऊत कारखान्यात गेले.