उद्धव ठाकरे जेव्हा बोलू लागतात तेव्हा भाजपच्या ‘पोटात गोळा’ येतो, संजय राऊत

sanjay-raut-action

“हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर उद्धव ठाकरे हे देशातील असे नेते आहेत ज्यांच्या मुलाखतीची चर्चा ही मुलाखतीआधीच सुरु होते. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला आम्ही संपवलं असे भाजपवाले सांगतात. मात्र हेच उद्धव ठाकरे बोलू लागतात तेव्हा भाजपच्या पोटात सर्वात जास्त गोळा येतो.” असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. 26 आणि 27 जुलै रोजी दोन भागांमध्ये उद्धव ठाकरे यांची मुलाखत प्रसिद्ध होणार असल्याची माहिती यावेळी राऊत यांनी दिली.

“देवेंद्र फडणवीस काय बोलतात यापेक्षा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल यावर आमचा विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस हे काही सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नाहीत. किंवा ते विधानसभेचे अध्यक्षही नाहीत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहणार नाहीत असे जेव्हा आम्ही सांगतो. तेव्हा आमचं बोट हे सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याकडे आहे. अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेले जे निर्देश आहेत, त्याच पालन विधानसभा अध्यक्षांनी जर तंतोतंत केलं तर देवेंद्र फडणवीस जे बोलतात त्याला अजिबात काही तथ्य आणि अर्थ नाही. हे देवेंद्र फडणवीसांना माहित आहे. देखल्या देवा दंडवत ही मराठीमध्ये म्हण आहे. त्यामुळे सूर्य लवकरच मावळणार आहे.” असे राऊत यांनी सांगितले.

“तीन महिने पूर्ण होत असल्याने विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावाच लागेल. त्यांनी काहीही निर्णय घेतला तरी तो एकनाथ शिंदे आणि भाजपच्या विरोधातच जाईल. कारण सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि त्यांचं खंडपीठ यांनी तीन महिन्यांपूर्वी जे निर्देश, ज्या सूचना दिलेल्या आहेत व जे निरीक्षण नोंदवलेलं आहे ते बदलता येणार नाही.” असे राऊत म्हणाले.