
शिवसेना वरळी शाखेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी वरळी शाखेच्या वतीने दर महिन्याच्या 17 तारखेला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. या 17 एप्रिल रोजी 160 वे रक्तदान शिबीर पार पडणार आहे.
माजी नगरसेवक अरविंद भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरळी नाका येथील शिवसेना शाखेत दरमहा 17 तारखेला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे 17 नोव्हेंबर 2012 रोजी महानिर्वाण झाल्यानंतर त्यांना अभिवादन करण्यासाठी दर महिन्याच्या 17 तारखेला हे रक्तदान शिबीर पार पडते. त्यामुळे इच्छुक रक्तदात्यांनी 17 एप्रिल रोजी वरळी नाका येथील शिवसेना शाखा येथे सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत रक्तदान करण्याचे आवाहन अरविंद भोसले यांनी केले आहे. संपर्क ः 9821581860.





























































