कोळसा व्यापाऱ्यांच्या घरापुढे शिवसेनेचे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर

चंद्रपुरात सध्या कोळसा व्यावसायिकांवर आयकर विभागाच्या धाडी सुरू आहेत. हे प्रकरण गाजत असताना शिवसेनेनं आज कोळसा व्यापाऱ्यांच्या घरापुढे जोरदार नारेबाजी करून कोळसा चोरांना अटक करण्याची मागणी केली.

मागील दोन दिवस शहरातील कोळसा व्यापारी नितीन उपरे, श्याम मित्तल, संदीप अग्रवाल, रणजीत छाबडा यांच्या घरांची आयकर विभागानं झडती घेतली. यांचे कार्यालय, कोळसा डेपो इथंही धाडी टाकल्या. कोट्यवधींचा कोळसा चोरल्याप्रकरणी ही धाड टाकण्यात आली. या कारवाईत महत्वाचे दस्तावेज आणि कोट्यवधींची रोख मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘गेल्या दहा वर्षांपासून जिल्ह्यात कोळसा चोरांचं रॅकेट सक्रिय आहे. ते आता हाती लागलं. यामुळं या चोरांना अटक करावी यासाठी शिवसेनेनं आज व्यावसायिकांच्या घरापुढे नारेबाजी केली.

माजी जिल्हाप्रमुख सतीश भिवगडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे नेते मनोज पाल, जयदीप रोडे, राजेश नायडू, सुरेश पचारे, माया पटले, वर्षा कोटेकर उपस्थित होते.