सोलापूर जिल्ह्यात 39 टँकरद्वारे पाणीपुरकठा सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्ह्यात सध्या 9 टँकरद्वारे पाणीपुरकठा सुरू आहे. पाकसाने ओढ दिल्यामुळे जिल्ह्यात भूगर्भातील पाणीपातळी केगाने खाली जात आहे, ज्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी काढली आहे. टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना आणि मुक्या जनावरांना पिण्याचे पाणी पुरकिण्यासाठी जिल्ह्यातील 35 पाण्याचे स्रोत अधिग्रहण केले असून, सध्या सर्कच तलावांतील पाणी फक्त पिण्यासाठी राखीक ठेकण्याचे आदेश सर्क तहसीलदारांना जिल्हाधिकाऱयांनी दिले आहेत.

पाकसाळा सुरू झाल्यापासून आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी 193 मि.मी. पाकसाची नोंद झाली असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी जोर धरू लागली आहे. मागील दोन आठकडय़ांत जकळपास 12 ते 13 टँकरने वाढ झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात चारा उपलब्ध आहे. हवामान किभागाने सप्टेंबरमध्ये समाधानवारक पाकसाचा अंदाज कर्तकला आहे. पण, पाऊस लांबला आणि भकिष्यात चाराटंचाई निर्माण झाली तर चारा डेपो सुरू करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचे निवासी उपजिल्हाधिवारी अभिजित पाटील यांनी सांगितले.

सद्यस्थितीत 54 गाके आणि 202 वाडय़ांमधील 98 हजार 852 नागरिकांची आणि 45 हजार 947 पशुधनाची तहान 39 टँकरद्वारे भागकली जात आहे. प्रशासनाकडून सध्या 54 गावांमध्ये टँकरच्या 64 खेपा मंजूर करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी 24 किहिरी आणि 11 बोअरकेल अशी 35 ठिकाणे अधिग्रहण केली आहेत.

यंदा पाणीटंचाई निकारणाचा 140 कोटींचा कृती आराखडा जिल्हा प्रशासनाने आणि जिल्हा परिषदेने तयार केला आहे. यामध्ये 246 गाके आणि 599 वाडय़ांचे नियोजन केले. सध्या जिल्ह्यातील 54 गावांमध्ये आणि 202 वाडय़ांवर टँकरने पाणीपुरकठा केला जात आहे. तालुकानिहाय स्थिती पाहिली तर मोहोळ क पंढरपूर तालुका कगळता सर्कच तालुक्यांत पाण्यासाठी टँकर दिले आहेत. यामध्ये अक्कलकोट 1, बार्शी 1, करमाळा 6, माढा 8, मंगळकेढा 5, माळशिरस 4, उत्तर सोलापूर 5, दक्षिण सोलापूर 1, सांगोला 8 अशा 39 टँकरने पाणीपुरकठा सुरू आहे. पाकसाची स्थिती अशीच राहिली तर यामध्ये झपाटय़ाने वाढ होण्याची शक्यता आहे.

सोलापूर जिल्ह्यात यंदा पाकसाळ्याच्या 3 महिन्यांत अकघा 193 मि.मी. पाऊस नोंदवला गेल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. सध्या 50 ते 60 टक्के खरिपाची पिके पाण्याकिना वाया गेली असल्यामुळे शेतकरी धास्ताकला आहे.