
कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्लीतील विशेष कार्यकारी दंडाधिकारी (SEM) न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. बुधवारी, २१ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने दोघांच्याही सुटकेचे आदेश दिले आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ करण्याची पोलिसांची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, या दोन्ही नेत्यांच्या न्यायालयीन कोठडीबाबत न्यायालयाने मंगळवारी निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर बुधवारी त्यांच्या सुटकेचे आदेश देण्यात आले.
१३ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. तेव्हापासून दोघेही दिल्लीतील तिहार तुरुंगात बंद होते. न्यायालयाच्या आदेशानंतर दोन्ही नेत्यांच्या सुटकेची प्रक्रिया सुरू झाली. सुटकेनंतर त्यांना मंदिर मार्ग परिसरातून बाहेर नेण्यात आल्याचे वृत्त आहे.
बातमी अपडेट होत आहे…




























































