स्टीव्ह जॉब्जने बनवलेल्या 45 वर्षे जुन्या कॉम्प्युटरचा लिलाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऍपल कंपनीच्या जुन्या कॉम्प्युटरचा लिलाव होणार आहे. 45 वर्षांपूर्वी ऍपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वॉजनिक यांनी स्वतःच्या हाताने हा कॉम्प्युटर बनवला होता. ऍपल 1 असे या कॉम्प्युटरचे नाव आसून कॅलिफोर्नियामध्ये त्याचा लिलाव होणार आहे. लिलावात सहा लाख डॉलर म्हणजे सुमारे 4.44 कोटी रुपयांपर्यंत बोली लागली जाईल, असा अंदाज आहे.

सुरुवातीच्या काळात स्टीव्ह जॉब्ज आणि स्टीव्ह वॉजनिक यांनी जे 200 कॉम्प्युटर बनवले होते, त्यापैकीच हा कॉम्प्युटर आहे. हवाईमध्ये आढळणाऱया एका वेगळ्या प्रकारच्या कोवा लाकडी फ्रेमपासून कॉम्प्युटर बनवण्यात आला आहे. जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा कॉम्प्युटर टेकचा संग्रह करण्याची आवड आहे, अशा लोकांसाठी ही पर्वणी आहे.

n ऍपल कॉम्प्युटर 1986 सालच्या पॅनासोनिक व्हिडियो मॉनिटरसह उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत फक्त दोन जणच त्याचे मालक झाले आहेत. हा कॉम्प्युटर कॅलिफोर्नियाच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रोफेसरने खरेदी केला होता. त्यानंतर त्या प्रोफेसरने 1977 साली तो एका विद्यार्थाला विकला होता. असं म्हटलं जातंय की त्यावेळी विद्यार्थ्याने कॉम्प्युटरची फ्रेम केवळ 48 हजार रुपयांना विकत घेतली होती.

मुंबईत चर्चगेट तसेच मरीन लाईन्स स्थानकांमध्ये न्यायदेवतेप्रमाणे दिसणाऱया महिलेची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. तसेच त्याशेजारी फलक उभारून त्यातून सामाजिक संदेश देण्यात येत आहेत. हा एका कॅम्पेनचा भाग असल्याचे समजते. स्थानकांमध्ये शिरणारे प्रवासी ही नेमकी कसली मोहीम असावी, याचे तर्कवितर्क लढवताना दिसत आहेत.