
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
जीएसटी वर्षपूर्तीलाच सरकारने गॅस दरवाढीचा भडका उडविला आहे. सबसिडी (अनुदानित) गॅस सिलिंडरच्या दरात २.७१ रुपये, तर विना सबसिडी सिलिंडरच्या दरामध्ये तब्बल ५५.५० रुपयांनी वाढ केली आहे.
या दरवाढीमुळे सबसिडी सिलिंडरच्या किमती ४९३ रुपयांवर गेल्या आहे. विना सबसिडी सिलिंडरवरील जीएसटीच्या दरात वाढ केल्यामुळे किमती वाढविल्याचे तेल कंपन्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, ही दरवाढ म्हणजे महागाईत आणखी भडकाच आहे.




























































