आई रागवल्याने तेरा वर्षाच्या मुलाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । पुणे

नव वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असताना धनकवडी भागात मनाला चटका लावणारी घटना घडली. अभ्यास कर म्हणून पालकांनी रागविल्याने तेरा वर्षाच्या मुलाने घरात बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला.

दर्शन मनिष भूतडा (वय १३) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. धनकवडी येथील गणेशनगर भागात भुतडा कुटुंबीय वास्तव्यास आहेत. दर्शनचे वडिल मनिष हे खासगी नोकरीत आहेत. दर्शन हा एका शाळेत आठवीत शिकत होता.

तो अभ्यास न करता सतत मोबाइल घेऊन बसत असल्याने त्याचे आई वडील त्यास रागवत होते. सोमवारी दुपारी तो मोबाईल घेऊन बसला होता. यामुळे त्याला रागवले. रागाच्या भरात तो अभ्यासासाठी बेडरूममध्ये गेला. बराच वेळ होऊन ही तो खोलीच्या बाहेर आला नाही. त्यामुळे दार उघडून पाहिले असता दर्शनने गळफास घेतल्याचे दिसले.

हे द्रुष्य बघून त्याच्या आई वडीलांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. सहकारनगर पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. पोलीसांनी धाव घेतली. पुढील तपास सुरु आहे.