शिंदे-फडणवीसांमध्ये खुर्चीसाठी झुंज – सुषमा अंधारे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात मागील दीडशे वर्षांत जेवढा दुष्काळ पडला नव्हता, तेवढा दुष्काळ यंदा पडला आहे. सरकार सॅटेलाईट पंचनामे करतेय. त्याचा काहीच उपयोग नाही. जगण्या-मरण्याची झुंज लागली आहे, मात्र शिंदे-फडणवीसांची खुर्चीसाठी झुंज सुरू आहे. दुसरीकडे बिष्णोई गँगवाले गृहमंत्र्यांची लायकी काढताहेत, असा जोरदार हल्लाबोल शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर केला.

लॉरेन्स बिष्णोई गुजरातच्या साबरमती जेलमध्ये आहे. तिथून तो ऑपरेट करताना देशाचे गृहमंत्री काय करताहेत? त्यांना फक्त मिंधेंना भेटायला वेळ आहे का? बिष्णोई गँगचे गुंड कुठे आहेत तर गुजरात, दिल्ली, बिहार, हरयाणामध्ये, तर गोळीबार होतोय महाराष्ट्रात. या सगळय़ा राज्यांत भाजपची सत्ता आहे. गोळीबाराच्या घटना घडत असताना महाराष्ट्रातील सत्ताधारी खुशाल आहेत, असा जोरदार हल्ला अंधारे यांनी चढवला.